This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Health & FitnessLocal News

*जरूरतमंदा साठी रक्तदान शिबिराचे आयोजन*

*जरूरतमंदा साठी रक्तदान शिबिराचे आयोजन*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

काकती येथील सिद्धेश्वर मंगल कार्यालय मध्ये रविवार दिनांक 28 जानेवरी रोजी डीवाईन हेल्पिंग हँड्स ग्रुप तर्फे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये शंभरच्या वर रक्तदात्यांनी भरभरून प्रतिसाद मिळाला.रेड क्रॉस सोसायटी व के एल ई हॉस्पिटल चा स्टाफ उपस्थित होता.

काकती ग्रामपंचायत अध्यक्षा सौ वर्षाताई मुचंडीकर यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली व त्यांनी आपल्या विचारामध्ये डिव्हाईन हेल्पिंग हँड चा कार्याची भरभरून प्रशंसा केली रक्त हे फॅक्टरीमध्ये मिळत नसून ते फक्त मानवामार्फत मिळवले जाते व जरूरतमंदाना रक्ताचे किती महत्त्व असते या मोर माणसाचा जीव वाचतो रक्तदान वर्षातून किमान दोनदा तरी केले पाहिजे असे विचार व रक्तदानाचे महत्त्व त्यांनी उपस्थितांमध्ये प्रकट केले.

रेड क्रॉस चे डॉ.अशोक बदामी लेफ्टनंट सुमानी शर्मा यांनी या कार्याची प्रशंसा केली या शिबिराला काकती गावातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. बेळगाव मधून पांगुळ गल्ली येथील संदीप पाटील ग्रुप, अंनगोळ व गुड शेठ रोड येथील श्रीधर लोहार व विठ्ठल राऊळ ग्रुप च्या वतीने भाग देण्यात आला काकती ग्रामपंचायत सदस्य प्रवीण रेडेकर, मनोहर शेखरगोळ, विद्याताई सुरेखर सामाजिक कार्यकर्ते श्री राजू राऊत, अनिस सौदागर, कामानी चौगुले, गजानन नाईक, सुधीर पवार, पांडुरंग पवार, रमेश केसरगोप, बसवंत उदगडगी, प्रवीण शेटके, भावेश सासुलकर, संतोष कांबळे, इम्रान मुल्ला, योगेश बालाजी जाधव, आशिष गव्हाणे, प्रथमेश काकतकर, विमलेश नागवडेकर यांनी योगदान दिले
डिवाइन हेल्पिंग हँड्स चे अध्यक्ष गजानन गव्हाणे, विनय लाशे, पवन माळदकर, सुनिता गव्हाणे यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार मानले


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24