सांबरा येथे मे महिन्यात होणाऱ्या श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त रथ जोडणीच्या कामाला वेग आला आहे. रथाच्या चार थरांची उभारणी झाली आहे.
तब्बल 18 वर्षांनंतर सांबरा येथील महालक्ष्मी देवीची यात्रा दि. 14 मे पासून सुरु होणार आहे. साधारण 70 फूट उंचीचा रथ यात्रेमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. महिन्याभरापासून रथ बांधणीच्या कामाला प्रारंभ करण्यात आला. गावातील सुतार आणि रथकार यांच्यासोबत इतर कारागीर रथ बांधणीसाठी झटत आहेत. कलाकुसरीचे लाकडी खांब वापरून हा रथ उभारण्यात येणार आहे. 1950 साली पहिल्यांदा रथ बांधणी करण्यात आली होती. त्यावेळेचे लाकडी खांब आणि साहित्य वापरण्यात येत आहे.
खराब झालेले लाकडी साहित्य बदलण्यात येत आहे. मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत रथ बांधणी तर एप्रिल अखेरपर्यंत रथ सजावटीचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती यात्रा कमिटीच्यावतीने देण्यात आली आहे.