343 वा संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शंभूराजांना दुग्धाभिषेक करून विधिवत पूजा
छत्रपती शंभूराजांचा 343 वा राज्याभिषेक सोहळा बेळगाव मध्ये साजरा झाला. शहरातील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात शंभूराजांना दुग्धाभिषेक करून विधिवत पूजा करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. माजी आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला.
शूरवीर संभाजीराजांनी मुघल साम्राज्याशी कडवी झुंज देत 120 युद्ध खेळून ती जिंकली आणि मराठीशांच्या अस्तित्वात अबाधित ठेवत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारे स्वराज्य घडविण्यात शूरवीर संभाजीराजे यांनी मोलाचे योगदान दिले असे प्रतिपादन राज्याभिषेक सोहळा दरम्यान माजी आमदारांनी व्यक्त केले .
धर्मवीर संभाजीराजे सुशोभिकरण समितीचे अध्यक्ष सुनील जाधव यांनी प्रास्ताविक केले. या राज्याभिषेक सोहळ्याकरिता श्रीनाथ पवार ,प्रमोद कंग्राळकर ,निशांत कुडे ,श्रवण झुटे ,मंथन कामुले ,सुमित पाटील ,प्रसाद पवार यांच्यासह अन्य युवक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.