सांबरा येथे होणाऱ्या श्रीमहालक्ष्मी यात्रेनिमित्त देवी रंगाला काढण्याचा धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. महालक्ष्मी देवी मंदिर आवारात झालेल्या कार्यक्रमाला शेकडो ग्रामस्थांनी हजेरी लावली होती.
हकदारांच्यावतीने देवीची ओटी भरून विधिवत पूजा करण्यात आली. यात्रा कमिटीचे अध्यक्ष राजू देसाई यांनी धार्मिक विधीची माहिती दिली. मेत्री आणि असोदी कुटुंबियांच्यावतीने गाऱ्हाणे घालण्यात आले. शांततेत आणि भक्तिमय वातावरणात यात्रा करण्याचा संकल्प करण्यात आला. तसेच पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले.
तब्बल 18 वर्षानंतर सांबरा गावची श्री महालक्ष्मी यात्रा होणार आहे. यात्रेसाठी 70 फूट उंचीचा लाकडी रथ बनविण्यात येत आहे. मंगळवार दि 14 मे 2024 रोजी यात्रेला सुरुवात होणार आहे. पहिले चार दिवस रथोत्सवासह नऊ दिवस यात्रा होणार आहे. दि 22 मे 2024 रोजी यात्रेची सांगता होणार आहे.