बांधकाम कामगार संघटना व ‘मजदूर नवनिर्माण संघाच्या’ वतीने कामगार, विद्यार्थी तसेच रोजगार (मनरेगा) कामगारांचे जिल्हा कामगार कचेरीच्या अधिकाऱ्यांना निवेदन –
बांधकाम कामगारांच्या मुला-मुलींना कामगार कल्याण मंडलातर्फे शिष्यवृत्ती मागिल दोन वर्षापासून मिळालेली नाही. भविष्यकाळानूसार त्यात वाढ करण्याऐवजी असलेल्या स्कॉलरशिपमध्ये अन्यायपूर्वक 75% ने कपात केलेली आहे. सरकाराच्या या आदेशाविरूध्द आवाज उठविण्यासाठी कामगारांनी व विद्यार्थ्यांनी शुक्रवार दि. 12/01/2024 रोजी दुपारी 4 ते 6 वाजेपर्यंत बेळगांव जिल्हा कामगारभवन समोर आंदोलन केले.
मनरेगा कामगारांना 2013 ते 2019 पर्यंत लेबर कार्ड ची सुविधा मिळत होती, 2019 नंतर मनरेगा कामगारांना बंद केली आहे, ती सुविधा या कष्टकरी महिलांसाठी पुन्हा चालू करावी.
2023 साली पियुसीच्या विद्यार्थ्यांना लॕपटाॕप देऊ असे कामगार मंडळाने जाहीर केले होते, ते अजूनही विद्यार्थ्यांना मिळालेले नाहीत.
सरकारने पाच वर्षापूर्वी घोषित केल्याप्रमाणे कामगारांना घर बांधण्यासाठी 5 लाखची रक्कम कोणासही मिळाली नाही.
तसेच लग्नासंदर्भात सहाय्यधन, लेबर कार्ड रिनिव्हल केल्यावर कित्येक कामगारांचे कार्ड रिजेक्ट होत आहेत.
अशा सर्व तक्रारीचे निवेदन ॲड एनआर लातूर व राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठल देसाई व शोभा कुंडेकर यांच्या सहकार्याने बांधकाम कामगार संघटना आणि ‘मजदूर नवनिर्माण संघाच्या’ मार्फत डेप्यूटी लेबर कमिशनर डीजी नागेश यांना देण्यात आले. यावेळी कामगार, विद्यार्थी व दिवसभराचे आपले रोजगाराचे काम आटोपून मोर्चात सहभागी होण्यासाठी आलेल्या
वनिता तारीहाळकर, कावेरी सांबरेकर, निता अवचारी, सुनिता पाटील, निता अष्टेकर, रिना सांबरेकर, गिरीजा पाटील, अनिता सांबरेकर, तनुजा पाटील, सविता देसाई, मंजुळा गुरव, ज्योती खेमनाळकर, लक्ष्मी बेडरे, रेणूका हट्टीकर, विद्या घाडी, अरूणा धामणेकर, लक्ष्मी हट्टीकर, शालन धामणेकर, मयुरी कुगजी, रेखा पाटील, रंजना पोटे, शोभा चौगुले, मालन हलगेकर,
रेखा चौगुले, सुलोचना चौगुले, रेणूका हलगेकर, मिनाबाई कुंडेकर, रत्ना पुजारी, लक्ष्मी कुंडेकर, यल्लूबाई बस्तवाडकर, माधूरी धामणेकर, सुरेखा कुगजी या रोजगाराच्या कष्टकरी महिला आपल्या गटप्रमुखांसह आल्या होत्या, तसेच बेळगांव तालुक्यातील बांधकाम कामगारांनी व विद्यार्थ्यांनी उद्यमबाग येथील कामगार कचेरीसमोर उपस्थित दर्शवली होती.