बेळगाव : वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि. ५) सायंकाळी पाचच्या सुमारास उघडकीस आली. महालिंग दुर्गाप्पा म्यागेरी (वय ५८, रा. एससी मोटर्सजवळ, मारुतीनगर चौथा क्रॉस) असे मृताचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, महालिंग यांना दारुचे व्यसन होते. यातूनच गेल्या काही दिवसांपासून त्यांची मानसिक स्थिती बिघडली होती. सोमवारी दोघेजण कामानिमित्त बाहेर गेले होते.
त्यांचा मुलगा व सून घरीच होते. दुपारी चारच्या सुमारास त्यांनी बेडरुममध्ये गळफास घेतला. हे मुलगा मंजुनाथ याला समजल्यानंतर त्याने तातडीने खाली उतरवून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचाराचा उपयोग न होता पाचच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मंजुनाथ म्यागेरी याने दिलेल्या फिर्यादीनुसार माळमारुती पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे.