बेळगाव : चिकोडी रेल्वेस्थानकाजवळ धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू झालेल्या युवकाची ओळख पटली आहे. सुनिल बाळू चेळके (वय ३२, रा. कोलिक ता. पन्हाळा जि. कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. ५ मार्चला रात्री निजामुद्दीन एक्सप्रेसमधून पडून त्याचा मृत्यू झाला होता.
त्याच्या खिशात आढळलेल्या सिमकार्डवरुन पोलिसांनी सुनीलचा पत्ता शोधून त्याच्या कुटुंबीयाना माहिती. सुनील कामानिमित्त गोव्याला गेला होता. कुटुंबीयाशी संपर्क साधून मंगळवारी गावी येत असल्याचे त्याने सांगितले होते. पण, रेल्वेतून पडून त्याचा मृत्यू झाला.