बेळगांव:माझी शाळा माझे कर्तव्य या घोष वाक्यातून प्रेरणा घेत कंग्राळी बुद्रुक येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेची नवीन सुसज्ज अशी इमारत बांधण्याकरिता माजी विद्यार्थ्यांनी आर्थिक मदत केली.
कंग्राळी बुद्रुक गावातील माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने शाळेच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले .असून अनेक दाणी लोकांनी सडळ हस्ते मदत केली आहे. आतापर्यंत शाळेची इमारत 50 टक्के पूर्ण झाली आहे. उरलेले काम पूर्ण करण्याकरिता अनेक माजी विद्यार्थी शाळेकरीता आर्थिक मदत करत आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजू कुमार ,संतोष कडोलकर , नितीश पवार, अमोल कोणेरी,वकील सुधीर चव्हाण, ग्रा पं सदस्य यल्लोजीराव पाटील, दत्ता पाटील, दादासाहेब बद्दरगडे, राजू मन्नोळकर,अमित सुतार, गजानन पाटील, सुहास भेखणे ,यल्लाप्पा निलजकर, मल्लाप्पा पाटील, गोपाळ पाटील, निरंजन जाधव,सदानंद चव्हाण हे उपस्थित होते. यांच्या हस्ते दीप प्रज्वलन तसेच सरस्वती मातेच्या फोटोचे पूजन करून कार्यक्रमाला चालना देण्यात.
यानंतर 1993-94 विद्यार्थ्यांनी 1 लाख 11 हजार रुपये, 1997-98 च्या विद्यार्थ्यांनी 65 हजार रुपये, तर 2002-2003 च्या विद्यार्थ्यांनी 51 हजार रुपयाची शाळेला आर्थिक मदत केली.
आपण जरी या शाळेमध्ये शिकलो नाही तरी शाळा टिकावी , मराठी भाषा टिकावी. व आपल्या वडिलांच्या शाळेची प्रगती व्हावी.यासाठी जर्मनी येथे कार्यरत असणारा अमोल कोनेरी यांनी शाळेच्या नूतनीकरणासाठी 50 हजार रुपयेचे मोलाचे सहाय्य केले आहे.
या मराठी शाळेमध्ये शिकून मोठे व्यक्तिमत्व मिळविलेल्या माजी विद्यार्थ्यांनी तसेच दाणी व्यक्तींनी सढळ हस्ते शाळा इमारतीच्या बांधकामाकरिता आर्थिक मदत करावी असे आव्हान माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.