This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*दिव्यांचा सण दीपावली साठी बाजारपेठ सजली*

*दिव्यांचा सण दीपावली साठी बाजारपेठ सजली*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

दिव्यांचा सण दीपावली साठी बाजारपेठ सजली असून विचार विविध प्रकारचे साहित्य बाजारात उपलब्ध आहे. साध्या पणातीची किंमत दहा रुपयांपासून आहे.विविध प्रकारचे दिवे यावर्षी दिवाळीचे आकर्षण ठरले आहेत.हे विविध प्रकारचे दिवे खरेदी करण्यासाठी ग्राहक गर्दी करत आहेत .हे दिवे वेगवेगळ्या आकाराचे आहेत .अत्यंत आकर्षक अशा या दिव्यांची किंमत वीस रुपयांपासून दोन हजार रुपयांच्या पर्यंत आहे.चिनी आकाश कंदील खरेदी करणे लोकांनी टाळले असून भारतीय आकाशकंदील खरेदी करण्याकडे लोकांचा अधिक कल आहे.कागदापासून तयार केलेल्या आणि बांबू पासून तयार केलेल्या आकाश कंदिलाना ग्राहकांची अधिक मागणी आहे.आकाश कंदील पन्नास रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.चिनी बनावटीच्या लाईटच्या माळानी मात्र बाजारपेठ व्यापली आहे.चिनी लाईटच्या माळा अत्यंत आकर्षक असल्याने ग्राहक या माळाना पसंती देत आहेत.याशिवाय दिव्यांचे वेगवेगळे स्टँड यावर्षी बाजारात उपलब्ध झाले आहेत.एका स्टँड मध्ये पंधराहून अधिक दिवे लावता येतात.विविधरंगी रांगोळ्या देखील बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.विविध प्रकारची सुवासिक तेले,उटणे,साबण यांना देखील मागणी वाढली आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24