This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

EntertainmentLocal News

*”दडपण” मराठी चित्रपटाला जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद*

*”दडपण” मराठी चित्रपटाला जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आज दडपण सिनेमाच्या टीमला मराठा मंडळ डिग्री व पियू कॉलेज त्याचप्रमाणे मराठा मंडळ हायस्कूल सेंट्रल हायस्कूल व जिजामाता हायस्कूल येथे प्रमोशनसाठी आमंत्रित करण्यात आले होते हायस्कूल व महाविद्यालयीन अशा सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी या टीमचे खूप जोशात स्वागत केले व चित्रपटाला भरपूर प्रतिसाद देणार असल्याचे सांगितले दडपण या चित्रपटाचे बेळगाव मधील रसिकांमध्ये प्रचंड आकर्षण वाढत आहे

पाच तारखेला शनिवारी हा चित्रपट ग्रुप सिनेमा थेटर येथे प्रदर्शित होत आहे त्या शनिवारचा फर्स्ट डे फर्स्ट शो महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते व श्रीराम सेना हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री रमाकांत दादा कोंडस्कर यांनी सुरुवातीलाच खरेदी केलेला आहे तसेच दडपण सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी त्याची लोकप्रियता इतकी वाढत आहे की हा चित्रपट सर्व चित्रपटांचे रेकॉर्ड मोडणार की काय असे वाटत आहे चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालेले आहे.

त्याचप्रमाणे या चित्रपटाचे निर्माते राजेश लोहार लेखक दिग्दर्शक संतोष सुतार मुख्य अभिनेते शशिकांत नाईक मुख्य अभिनेत्री निधी राऊळ त्याचप्रमाणे सहकलाकार जोत्स्ना पाटील व राधिका पाटील यांनी लोक थेटर येथे जाऊन जमलेल्या प्रेक्षकांना आपल्या चित्रपटाबद्दल माहिती देऊन चित्रपटाचे प्रमोशन केले व तेथील बेळगावकर रसिक प्रेक्षकांनीही या चित्रपटाला आपण नक्कीच पाठिंबा देऊ व प्रचंड अशी पब्लिसिटी करून हा चित्रपट सर्वांनाच बघायला सांगू असे जाहीर केले व जल्लोषात या सर्व कलाकारांचे स्वागत केले. अशा प्रकारे दडपण या चित्रपटाची संपूर्ण बेळगाव मध्ये लोकप्रियता वाढत आहे व लोकांच्या मनाला उत्सुकता लागलेली आहे की केव्हा एकदा 5 तारीख येते आणि हा चित्रपट आम्ही पाहतो. हा चित्रपट येत्या शनिवारी 5 ऑगस्ट 2023 रोजी ग्लोब सिनेमा थिएटर मध्ये प्रदर्शित होत आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24