This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsPolitics

*महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार महादेव पाटील यांचा नामांकन अर्ज  दाखल*

*महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार महादेव पाटील यांचा नामांकन अर्ज  दाखल*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगांव:शक्ती प्रदर्शनाने समिती उमेदवार महादेव पाटील यांनी आपला नामांकन अर्ज दाखल केला प्रारंभी त्यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार घालून अभिवादन केले त्यानंतर बैलगाडीत विराजमान होत मिरवणूक काढली.

या शक्ती प्रदर्शनाची सुरुवात भगव्या मय वातावरणात झाली. यावेळी असंख्य महिला या शक्तिप्रदर्शनात सहभागी झाल्या होत्या त्यांच्या हातामध्ये भगवेध्वज डोक्यावर भगवे फेटे परिधान करत एकच घोषणा सर्वजण देत मिरवणुकीत सहभाग घेतला.

हर हर महादेव घर घर महादेव असे म्हणत सर्वांनी महादेव पाटील यांना आपला पाठिंबा दर्शविला. यावेळी बैलगाडी मध्ये समितीनेते रमाकांत कोंडुस्कर यांनी बैल जोडीची सारथ करत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकातून यंदे खुट कॉलेज रोड किती राणी चन्नम्मा सर्कल मागे जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावरून शक्तिप्रदर्शनाची रॅली निघाली.

यावेळी बेळगाव शहर उपनगरासह ग्रामीण भागातील शेकडो स्त्री पुरुष यामध्ये सहभागी झाले होते त्याचबरोबर समितीनेते रमाकांत कोंडुस्कर धनंजय पाटील शुभम शेळके यांच्यासह अन्य महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24