यनतारा ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री. तिने अभिनेता शाहरूख खान यांच्या ‘जवान’ या सिनेमाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. आता नयनतारा गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयष्यामुळे जोरदार चर्चेत आली आहे. मध्यंतरी चर्चा होती की, नयनतारा हिच्या आयुष्यात मोठे वादळ निर्माण झाले आहे.
इतकेच नाहीतर नयनतारा आणि तिच्या पतीमधील वाद हा विकोपाला गेला आहे. नयनतारा ही लवकरच पतीपासून घटस्फोट घेणार असल्याचेही सांगितले गेले. मात्र, या चर्चावर नयनताराने भाष्य करणे टाळल्याचे पाहण्यास मिळत आहे. आता नयनतारा हिने सर्वांची तोंडंही बंद केल्याचे तिच्या पोस्टवरून बघायला मिळत आहे.