This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*‘ कलाश्री ‘ च्या चौथ्या बक्षिस योजनेची पहिली सोडत थाटात : नावगेच्या लता कार्लेकर ठरल्या एक लाख रुपये एफडी च्या भाग्यवान विजेत्या*

*‘ कलाश्री ‘ च्या चौथ्या बक्षिस योजनेची पहिली सोडत थाटात : नावगेच्या लता कार्लेकर ठरल्या एक लाख रुपये एफडी च्या भाग्यवान विजेत्या*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

‘ कलाश्री ‘ च्या चौथ्या बक्षिस योजनेची पहिली सोडत थाटात : नावगेच्या लता कार्लेकर ठरल्या एक लाख रुपये एफडी च्या भाग्यवान विजेत्या

बेळगाव : कलाश्री बंब आणि स्टील फर्निचर आयोजित चौथ्या भव्य बक्षीस योजनेची पहिली बंपर सोडत बुधवार 20 डिसेंबर 2023 रोजी थाटात पार पडली.

पहिल्या ड्रॉ चा एक लाख रुपये मुदत ठेव बक्षीसाचा मानकरी कोण ? याबद्दल सभासदांमध्ये उत्सुकता होती. आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कलाश्री ‘ च्या चौथ्या बक्षिस योजनेच्या एक लाख रुपये एफडी ( मुदत ठेव) च्या पहिल्या भाग्यवान विजेत्या ठरल्या नावगे गावच्या लता कार्लेकर.

एक लाख रुपयांची ठेव पावती देऊन पहिल्या सोडतीच्या मानकरी लता कार्लेकर. यांचा गोव्याचे माजी वन व सहकार मंत्री विनय तेंडूलकर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

चौथ्या भव्य बक्षीस योजनेच्या पहिल्या बंपर सोडतीचे औचित्य साधून कलाश्री परिवार संचलित ‘ कलाश्री को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड ‘ या सोसायटीचा उद्घाटन सोहळा थाटात पार पाडण्यात आला. कारंजीमठाचे महास्वामी गुरुसिद्ध स्वामी यांच्या हस्ते कलाश्री सोसायटीचेही उद्घाटन करण्यात आले.

यावेळी झालेल्याकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कलाश्री समुहाचे अध्यक्ष प्रकाश डोळेकर होते. व्यासपीठावर गोव्याचे माजी वन मंत्री व सहकार मंत्री विनय तेंडूलकर यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी उद्योजक विनायक कडोलकर , विठ्ठल गवस , उचगांव ग्राम पंचायत अध्यक्षा मथुरा तेरसे व उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे, कलाश्रीच्या संचालिका सुकन्या डोळेकर यांच्या हस्ते दिप प्रज्वलित करण्यात आला.

कलाश्री परिवाराने मागील 28 वर्षांपासून ग्राहक आणि सभासदांची जपलेली विश्वासार्हता हीच कलाश्रीच्या यशाचे गमक असल्याचे मत मान्यवरांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

पहिल्या लकी ड्रॉ मानकऱ्यासोबत चौघां भाग्यवान सभासदांना चार पैठणी साड्याही देण्यात आल्या. रुद्रांश कुरणे (गोंधळी गल्ली, बेळगाव) , परशराम ओसापगोळ ( चन्नहोसूर ), लगमव्वा गोडकरी ( हावळ नगर, मच्छे, बेळगाव), किरण बेळगांवकर ( बंबरगा) हे मान्यवर ग्राहक पैठणीचे मानकरी ठरले . त्यानंतर कार्यक्रमास वेळेवर उपस्थित असलेल्या पाच भाग्यवान सभासद , पाच कलाश्री सेंटर मधून किराणा खरेदी केलेले ग्राहक परशराम पाटील, दीपक कुंभार युवराज, मारुती गुरव व बसवराज विटप्पन्नवर यांचा, तसेच पाच कर्तबगार डीलर अशा 15 जणांचा सत्कार करण्यात आला

यावेळी 500 पेक्षा जास्त ग्राहक, सभासद, डीलर व हितचिंतक उपास्थित होते . कलाश्री ग्रुप चे चेअरमन प्रकाश डोळेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. टी.डी पाटील यानी कार्यक्रमाचे सुत्रसंचालनकेले तर सुकन्या डोळेकर यांनी आभार मानले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24