बेळगाव तारीख 26 जानेवारी 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बेळगाव जिल्हा शाखेच्या वतीने 26 जानेवारी 2024 रोजी *प्रजासत्ताक दिन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम* बेळगाव बेळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात समोरील अंगणात शुक्रवार दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी सकाळी आठ वाजता विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने मोठ्या थाटात कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बेळगाव जिल्हा शाखेचे अध्यक्ष समाजसेवक श्री जोतीबा सहदेव चव्हाण-पाटील होते.
ध्वज पूजन ग्रामीण महिला अध्यक्ष सौ प्रेमा पाटील यांनी केले. ध्वजारोहण बेळगाव जिल्हा अध्यक्ष श्री ज्योतिबा चव्हाण-पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आल्या. रामकृष्ण के. सांबरेकर यांनी नारळ वाढविले. फोटो पूजन अमोल देसाई आणि सचिव दुर्गेश मेत्री यांनी फोटो पूजन करून कार्यक्रमाला चालना दिली. याप्रसंगी गोपी मेलगे, साई बल्लारी, रुक्मिणी बल्लारी यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त विचार मांडले. यावेळी इस्माईल मुल्ला, सिद्धरामय्या बेन्नाळकर , मनोज पाटील, आप्पाजी संपले, ओम बिरजे उपस्थित होते; सुत्रसंचालन विनायक पाटील यांनी केले तर आभार आप्पाजी सपले यांनी मानले. यावेळी विविध संघटनांचे आणि विविध संस्थांचे पदाधिकारी सदस्य शिक्षक विद्यार्थी पालक कर्मचारी हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.