बेळगाव बार असोसिएशन आणि बेळगाव आदिवक्ता परिषद कर्नाटक उत्तर बेळगाव युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने आज जुने बार असोसिएशन हॉल (टी.व्ही. हॉल) मध्ये दुपारी 2 वाजता स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला .
यावेळी या कार्यक्रमाला रामकृष्ण मिशन आश्रम, बेळगावचे श्री स्वामी मोक्षातमानंदजी महाराज उपस्थित होते त्यांनी स्वामी विवेकानंदांचे विचार वकिलांना सांगितले .
या कार्यक्रमाला माननीय प्रा. जिल्हा व सत्र न्यायाधीश, बेळगावच्या श्रीमती. एल. विजयालक्ष्मी देवी प्रमुख पाहुण्या तसेच बार असोसिएशनचे कार्यकारी अध्यक्ष ॲड सुधीर चव्हाण यांच्यासहित वकील बांधव उपस्थित होते.