बेळगाव येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान महाविद्यालयात विज्ञान विभागातर्फे श्रीनिवास रामानुजन यांचा 137 वा जन्मदिवस ‘गणित दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी आणि वक्ता म्हणून प्राणीशास्त्र विभागाचे प्रा.जी.एम. कर्की हे उपस्थित होते. हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एच .जे.मोळेराखी यांच्या सानिध्यात पार पडला.
कार्यक्रमाचा प्रारंभ बी.एसी. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या ईशस्तवनाने झाला. तद्नंतर गणित विषयाच्या विभाग प्रमुख प्रा. मधुप्रिया गुळी यानी प्रस्तावना मांडून उपस्थितांचे स्वागत केले. श्रीनिवास रामानुजन यांच्या फोटो पूजनानंतर प्रमुख अतिथी या नात्याने बोलताना प्रा. जी.एम. कर्की म्हणाले, गणित हा विषय मनुष्य जीवनाचा एक प्रमुख अंगच आहे. रामानुजांच्यामुळे गणित हा विषय पूर्ण जगाला माहित झाला. गणित विषय वाटायला अवघड आहे, परंतु योग्य रूपाने समजून घेतल्यावर जीवनच सार्थक झाले असे वाटते.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ एच .जे. मोळेराखी म्हणाले की, रामानुजांच्या मुळेच गणित विषयाची मांडणी आणि महत्त्व जगाला माहीत झाले. रामानुजांचा जन्मदिवसा मुळेच गणित विषयाची आवड विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये त्यांना दिशा दाखविण्यासाठी उपयोगी पडते. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. डी.एम. मुल्ला यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल एस. सी. कामुले यांनी केले. या कार्यक्रमाला प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.