This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*नाफेड आणि एनसीसीएफ महाराष्ट्रकडून दोन लाख मेट्रिकटन कांदा खरेदी करणार*

*नाफेड आणि एनसीसीएफ महाराष्ट्रकडून दोन लाख मेट्रिकटन कांदा खरेदी करणार*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नवी दिल्ली,18: महाराष्ट्रातून दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय, एनसीसीएफ (NCCF) आणि नाफेडच्या (NAFED) माध्यमातून केंद्र सरकारने घेतला असल्याची माहिती, एनसीसीएफच्या व्यवस्थापकीय संचालिका अनिस जोसेफ चंद्रा यांनी नाशिकमध्ये आज दिली.

देशातील ६५ ते ७० टक्के कांदा नाशिक जिल्ह्यातून खरेदी करणार असल्याचे श्रीमती चंद्रा यांनी सांगितले. नाशिकसह अहमदनगर, धुळे, पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतून कांदा खरेदी सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत एनसीसीएफ आणि नाफेडमार्फत अंदाजे पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यात आला आहे. एनसीसीएफने दोन लाख ८९ हजार ८४८ मेट्रिक टन कांदा खरेदी केल्याचे त्यांनी सांगितले. नाशिकमध्ये नाफेड आणि एनसीसीएफकडून कांदा खरेदीसाठी केंद्रांची संख्या वाढवणार असल्याचेही श्रीमती चंद्रा यांनी सांगितले.

एनसीसीएफच्या वतीने ग्राहकांच्या हितासाठी दिल्ली, कोलकाता, पाटणा, बंगळुरू, मुंबई आणि नाशिक अशा ११४ शहरांमध्ये १ हजार १५५ मोबाइल व्हॅनद्वारे २५ रुपये प्रति किलोने कांदा विक्री सुरू केली आहे. कांदा, गव्हाचे पीठ, डाळींपाठोपाठ एनसीसीएफतर्फे मूगडाळ आणि तांदूळदेखील अत्यल्प दरात विक्री करणार असल्याची ही माहिती श्रीमती चंद्रा यांनी यावेळी दिली.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24