बेळगाव : महिन्याभरापूर्वी ब्रम्हनगर क्रॉस जवळ दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या सौ. दिव्या सुजय पाटील (वय २४) रा. महावीर नगर उद्यमबाग यांचे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले.
१ जानेवारी रोजी ब्रम्हनगर क्रॉस जवळ झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाल्या होत्या.
त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान उपचाराचा उपयोग न झाल्यामुळे आज त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, सासरे, सासू, नणंद असा परिवार आहे.चन्नेवाडी ता.खानापूर येथील रहिवासी दिलीप पाटील यांची कन्या तर धनंजय पाटील पुतणी होय.