This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*शनिवारी दहा हजाराहून अधिक लोकांनी घेतला प्रदर्शनाचा लाभ, शालेय विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शनिवारी दहा हजाराहून अधिक लोकांनी घेतला प्रदर्शनाचा लाभ, शालेय विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय
खानापूर: शिवस्वराज जनकल्याण फाउंडेशन खानापूर व दुर्गविर प्रतिष्ठान मुंबई यांच्या वतीने लोकमान्य भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाला शनिवारी प्रचंड प्रतिसाद लाभला असून एका दिवसात दहा हजाराहून अधिक नागरिकांनी प्रदर्शनाचा लाभ घेतला आहे.

नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शस्त्रांची माहिती मिळावी यासाठी आयोजित करण्यात प्रदर्शनाला पहिल्या दिवसापासून मोठा प्रतिसाद लाभला आहे. दुसऱ्या दिवशी अनेक शाळांनी विशेष सहलींचे आयोजन करीत विद्यार्थ्यांना शस्त्रे दाखविली दिली. त्यामुळे सकाळपासूनच नागरिकांच्या रांगा लागल्याचे दिसून आले. शास्त्र पाहण्यासाठी अधिक प्रमाणात गर्दी झाल्याने रात्री उशिरापर्यंत शस्त्र प्रदर्शन खुले ठेवण्यात आले होते. प्रदर्शन पाहण्यासाठी बालचमुंसह आबालवृध्द येत आहेत. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने दिवसभर मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी फाउंडेशनचे अध्यक्ष निरंजन सरदेसाई, उपाध्यक्ष रमेश धबाले, खजिनदार मुकुंद पाटील, सचिव बाळासाहेब शेलार, सुनिल पाटील, रणजीत पाटील, मिलिंद देसाई, संतोष गुरव, संकेत कोडचवाडकर, प्रभू कदम, नागेश भोसले आदी उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now