*मनरेगा कामगार निघाले दिल्लीला*
मजदूर नवनिर्माण संघाच्या माध्यमातून बेळगांव, धारवाड व विजापूर जिल्ह्यातील मनरेगा कामगार दिल्लीला चाललेल्या देशव्यापी आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघाले. –
कर्नाटक राज्यातील बेळगांव जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतीमधून रोजगाराचे (मनरेगा) काम करणाऱे कामगार सहभागी होण्यासाठी जात आहेत. फेब्रुवारी महिन्यापासून राजधानी दिल्लीमध्ये नरेगा संघर्ष मोर्चाद्वारे देशभरातील विविध राज्यांतील मनरेगा कामगारांच्या समस्यांबाबत काम करणाऱ्या संघटनांच्या सहकार्याने जंतरमंतर येथे 100 दिवस आंदोलन चालेल. या आंदोलनात मनरेगा कामगारांच्या वेगवेगळ्या समस्यांबाबत सरकारशी चर्चा चालू आहे. या आंदोलनात सामील होण्यासाठी कर्नाटकातील बेळगांव धारवाड व विजापूर जिल्ह्यातील (मनरेगा) कामगार
मजदूर नवनिर्माण संघ आणि जागृती महिला वक्कूट संघाच्या माध्यमातून दिल्लीला बेळगांव रेल्वेस्टेशन वरून आज दिनांक 22/03/2023 रोजी सायंकाळी हजरत निजामुद्दीन ट्रेनने निघाले आहेत. राजधानी दिल्लीमध्ये राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार, ओरिसा, महाराष्ट्र, दिल्ली, झारखंड, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आणि कर्नाटक राज्यातील राज्यातील मजदूर आपापल्या दिलेल्या तारखेच्या प्रमाणे सहभागी होत आहेत. तसेच यात उत्तर भारतातील राज्यातील व उत्तरपूर्व राज्यातील रोजगाराचे मजदूर पुढील काळात सहभागी होणार आहेत.