This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*बेळगाव रेल्वे बस स्थानकाची आमदारांनी केली पाहणी*

*बेळगाव रेल्वे बस स्थानकाची आमदारांनी केली पाहणी*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव रेल्वे बस स्थानकाची आमदारांनी केली पाहणी

बेळगाव:रेल्वेस्टेशन येथील बसस्थानकामध्ये बससेवेबरोबर इतर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. स्वच्छता, पथदीप, सुरक्षारक्षक इतर बाबी उपलब्ध करून द्याव्यात आणि बससेवा सुरळीत कराव्यात, अशी मागणी स्थानिक व्यापारी आणि रिक्षा संघटनेने केली आहे. गुरुवारी आमदार राजू सेठ यांनी बसस्थानकाला भेट दिली. यावेळी नागरिकांनी येथील बसस्थानकातील समस्यांचा पाढा वाचला. यावेळी परिवहनचे डीटीओ के. के. लमाणी, कॅन्टोन्मेंटचे सतीश मन्नोळी यांनाही सूचना करण्यात आल्या.

स्मार्ट सिटी अंतर्गत येथील बसस्थानकाचा विकास साधून कॅन्टोन्मेंटकडे हस्तांतर करण्यात आले आहे. मात्र कॅन्टोन्मेंटकडून योग्य त्या देखभालीअभावी बसस्थानकाची दुरवस्था झाली आहे. कचरा आणि पथदीप नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. विशेषतः परिवहनकडून या ठिकाणी बस पाठविल्या जात नसल्याने प्रवाशांचे हेलपाटे होवू लागले आहेत. बसेस गोगटे आहे. सर्कलमार्गे परस्पर जात असल्याने बसस्थानकातील प्रवाशांची गैरसोय होवू लागली आहे. त्यामुळे परिवहनने दक्षिण भागात धावणाऱ्या सर्व बस या बसस्थानकांमध्ये पाठवाव्यात, अशी मागणीही करण्यात आली.

कॅन्टोन्मेंट बोर्डाचि देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याने स्मार्ट बसस्थानक कचाट्यात सापडले आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंटने बसस्थानक परिवहनकडे हस्तांतरित करावे, अशी मागणीदेखील परिवहन अधिकाऱ्यांनी केली आहे. कॅन्टोन्मेंट आणि परिवहनच्या दुर्लक्षपणाचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसू लागला आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंट आणि परिवहनने सहकार्याने ही समस्या मार्गी लावावी, अशी मागणीही करण्यात आली.

चालकांना थांबण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी ऑटोरिक्षा मालक आणि चालक असोसिएशनने आमदार राजू सेठ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. रेल्वेस्थानकाच्या नूतनीकरणाच्या दरम्यान रिक्षा कंपाऊंडच्या बाहेर लावण्याचे आदेश दिले होते. मात्र आता काम पूर्ण झाल्यानंतर इतर वाहनधारकांप्रमाणे रिक्षावाल्यांनादेखील कंपाऊंडमध्ये परवानगी द्यावी.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24