बेळगाव तारीख 21 दिल्ली येथील छत्रसाल स्टेडियम व प्रितमपुरा येथील सर्वोदय विद्यालयाच्या मैदानावर असलेल्या 67 व्या अखिल भारतीय राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेत अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मुलींच्या हँडबॉल संघाला संमिश्र यश संपादन केले आहे.
स्पर्धेत संत मीरा शाळेचा चमू विद्याभारतीचे प्रतिनिधित्व करताना पहिल्या सामन्यात संत मीरा शाळेला आंध्रप्रदेश विरुद्ध 3-6 असा पराभव स्वीकारावा लागला पराभूत संघाच्या मेघा कलखांबकर, मनस्वी चतुर, ऐश्वर्या पत्तार आणि प्रत्येकी 1 गोल केला. दुसऱ्या सामन्यात संत मीरा शाळेला चंदिगड बरोबरच्या लढतीत 7-10 असा पराभव स्वीकारावा लागला,पराभूत संघाच्या मेघा कलखांबकरने 3 गोल ,मनस्वी चतुरने 2, ऐश्वर्या पत्तार व वर्षा परीटने प्रत्येकी 1 गोल केले. अखेरच्या साखळी सामन्यात संत मीरा शाळेने आयपीएससी संघाचा 16 -1 असा दारूण पराभव केला, विजयी संघाच्या ऐश्वर्या पत्तारने तिहेरी हॅट्रिकसह 10 गोल, मनस्वी चतुर व मेगा कलखांबकर यांनी प्रत्येकी 3 गोल केले.या संत मीरा संघात गोलरक्षक भावना बेरडे,सान्वी कुलकर्णी,ऐश्वर्या पत्तार, मेघा कलखांबकर, मनस्वी चतुर वर्षा परीट, सुहाणी गुदेकर, हिंदवी शिंदे, प्रणाली मोदगेकर,स्वाती फडनाडी, ऋतिका हलगेकर, या खेळाडूंचा संघात समावेश आहे ,या संघाला क्रीडाशिक्षिका मयुरी पिंगट, प्रशिक्षक शिवकुमार सुतार, यश पाटील, बसवंत पाटील शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, ऋतुजा जाधव, शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी ,संस्थेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे, क्रीडा शिक्षक चंद्रकांत पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहान लाभत आहे.