हिडकल जलाशयातून उजव्या तीरावर, डाव्या तीरावर व घटप्रभाच्या उप कालव्याला १० दिवस पाणी सोडण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिले आहेत.
त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, बेळगाव व बागलकोट जिल्ह्यातील नागरिक व पशुधन यांच्या पिण्याच्या पाण्याच्या उद्देशाने हिडकल जलाशय ते घटप्रभा डाव्या तीरा GLBC कालव्यापर्यंत 01-01-2024 ते 10-01-2024 पर्यंत जेआरबीएस चिक्कोडी उप (सीबीएस) आणि मार्कंडे कालव्याला 11-01-2024 ते 20-01-2024 असे एकूण 10 दिवस पाणी सोडण्याचे आदेश जारी केले आहेत.
त्यामुळे बेळगाव व बागलकोट जिल्ह्यातील शेतकरी व जनतेने पाण्याचा अपव्यय होणार नाही. याची काळजी घ्यावी आणि पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी योग्य पाऊले उचलावीत असे सांगण्यात आले आहे .