बेळगांव:मराठा लाईट इन्फंट्री यांच्या वतीने “मराठा गोल्फ कप 2024” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.सदर स्पर्धा 17,18 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेमध्ये बेळगाव, हुबळी,कोल्हापूर येथील 180 स्पर्धकांनी भाग घेतला होता. या सर्व स्पर्धकांमध्ये बेळगावचे नामवंत व्यवसायिक मिहीर पोतदार यांनी मराठा गोल्फ हे पदक हस्तगत केले आहे.
जिद्द कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी 180 स्पर्धकांमध्ये बेळगावचे नाव उज्वल केले आहे. आणि मराठा लाईट तर्फे आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकाविले आहे.व्यवसाय सांभाळत त्यांनी आपली आवड सुद्धा जपली आहे.
याप्रसंगी मराठा लाईट इन्फंट्रीचे कमांडंट ब्रिगेडियर जयदीप मुखर्जी यांच्या हस्ते मिहिर पोतदार यांना “मराठा गोल्फ चषक” देउन सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी तरुण भारतचे संपादक किरण ठाकूर,अजित यरगट्टी तसेच इतर स्पर्धक उपस्थित होते.
“मराठा गोल्फ चषक” विजेतेपद मीहीर पोतदार यांनी पटकाविले. असल्याने त्यांचे बेळगाव मधून अभिनंदन करण्यात येत आहे.