This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*समर्थ नगर मध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराला प्रचंड पाठिंबा*

*समर्थ नगर मध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराला प्रचंड पाठिंबा*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

समर्थ नगर मध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराला प्रचंड पाठिंबा
‌दिनांक चार मे रोजी सायंकाळी बेळगाव शहरालगतच्या समर्थ नगर भागामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार अमर यळूरकर यांचे प्रचार फेरी काढण्यात आले सुरुवातीला जुना पीबी रोड येथील रेणुका मंदिर येथे देवीचे पूजन करून समर्थ नगर भागामध्ये प्रचाराला सुरुवात करण्यात आली यावेळी समर्थ नगर भागातील कार्यकर्त्यांनी अमर यळूरकर यांचे पुष्पहार अर्पण करून स्वागत केले यावेळी महिलांनी आरती ओवाळून तसेच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून अमर येळूरकर यांचे मोठ्याने स्वागत केले यावेळी सामर्थ महिला मंडळाच्या महिला सदस्यांनी अमर येळूरकर यांच्या विजयाच्या घोषणा देत संपूर्ण समर्थ नगर परिसर दणाणून सोडला.

संपूर्ण समर्थ नगर परिसरामध्ये यावेळी समितीचा उमेदवार निवडून आणण्याचा एकमुखी निर्धार लोकांच्या नजरेत दिसून येत होता. यावेळी आपला उमेदवार निवडून देण्याचा निर्धार समर्थ नगरवासीयांनी केल्याचे दिसून आले. या प्रचार फेरीमध्ये संयुक्त समर्थ नगर युवक मंडळ शिवजयंती युवक मंडळ, बाल शिवराय युवक मंडळ, पंचम मंडळी, सामर्थ्य महिला मंडळ, रेणुका देवी महिला मंडळ यासह इतर महिला मंडळ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मुरली जांगले, वसंत हलगेकर ,संजय राऊत, बाळू किल्लेकर ,संजय पाटील, महेश पाटील ,प्रकाश पाटील ,रवींद्र हुलजी, संजय चतुर, मारुती कोंडुसकर तसेच राम कटारे, मंजुनाथ पालटेकर, विनायक हुलजी, सुनील सुभेदार, निखिल वराळे, राधेश शहापूरकर, पवन शिरोडकर, तसेच माजी नगरसेविका वैशाली हुलजी यांच्यासह कार्यकर्ते महिला ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24