This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे सेवानिवृत्त सैनिक मेळाव्याचे आयोजन*

*मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे सेवानिवृत्त सैनिक मेळाव्याचे आयोजन*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे सेवानिवृत्त सैनिक आणि अधिकाऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी दक्षिण भारत एरिया एक्स सर्व्हीसमन रॅली चे आयोजन करण्यात आले होते .पंधराशे हून अधिक सेवानिवृत्त अधिकारी,जवान आणि पन्नास वीर नारी दक्षिण भारत एरिया एक्स सर्व्हीसमन रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या.

यावेळी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर जॉय दीप मुखर्जी यांच्या हस्ते वीर नारींचा सन्मान करण्यात आला.सेवानिवृत्त सैनिकांच्या पेन्शन,आरोग्य आणि अन्य समस्या सोडवण्यासाठी विविध विभागाचे कर्मचारी,अधिकारी उपस्थित होते.आर्थिक बाबींवर बँक अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.आरोग्याच्या किरकोळ समस्यांचे निराकरण करण्यासाठी लष्कराच्या वैद्यकीय शाखेचे डॉक्टर उपस्थित होते.यावेळी दंत तपासणी करण्यात आली आणि महिलांच्या आरोग्य समस्यांवर डॉक्टरांनी तपासणी करून उपचाराच्या संबंधी मार्गदर्शन केले.

सेवानिवृत्त सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात,त्यांच्या समस्यांचे निराकरण व्हावे,देशाच्या रक्षणासाठी बहुमोल योगदान दिलेल्या सेवानिवृत्त सैनिकांचे दैनंदिन जीवन सुखकर व्हावे यासाठी दक्षिण भारत एरिया एक्स सर्व्हीसमन रॅली चे आयोजन करण्यात आले होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24