अग्निविर वायू प्रशिक्षणार्थींचा शानदार दीक्षांत समारंभ
प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अग्निविर वायू प्रशिक्षणार्थींचा शानदार दीक्षांत समारंभ सांबरा येथील एअरमन ट्रेनिंग स्कूल येथे पार पडला.२६७५ प्रशिक्षणार्थींनी बावीस आठवड्याचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले आहे. ट्रेनिंग कमांडचे एअर मार्शल, एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ आर. राधिष यांनी दीक्षांत समारंभाचे अध्यक्षस्थान भूषविले होते.
https://fb.watch/kWQ7Eyfdnf/?mibextid=Nif5oz
भारतीय वायू दलात अनेक बदल होत आहेत.हे बदल स्वीकारण्याची प्रत्येकाने तयारी केली पाहिजे.एक सक्षम हवाई दल म्हणून आपले हवाई दल ओळखले जात आहे. नवे तंत्रज्ञान आणि आव्हाने स्वीकारण्यास भारतीय हवाई दल सज्ज आहे.हवाई सैनिकाच्या जीवनातील महत्वाची बाब म्हणजे खडतर प्रशिक्षण आहे.हे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून तुम्ही नवी आव्हाने स्वीकारण्यासाठी सज्ज झाला आहात.
नवे तंत्रज्ञान सदैव आत्मसात करण्याची तयारी ठेवा.सदैव आव्हानांचा सामना करण्यास सज्ज राहिले पाहिजे असे उदगार ट्रेनिंग कमांडचे एअर मार्शल, एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ आर. राधिष यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अग्नीविर वायू प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना काढले.प्रशिक्षणार्थीनी शानदार संचलन करून प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली.महिला सबलीकरण अंतर्गत एअरमन ट्रेनिंग स्कूल येथे २८ जून पासून महिलांच्या प्रशिक्षणाला प्रारंभ होणार आहे.