This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

EntertainmentLocal News

*गीतकार रवींद्र पाटील यांचा कोजिमतर्फे सत्कार*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कोल्हापूर (प्रतिनिधी )आज कोल्हापूर विद्यापीठ येथील वि.स.खांडेकर भाषा भवन येथे कोजिम कोल्हापूर तर्फे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राज्याध्यक्ष , बेळगाव मराठी साहित्य संमेलन संयोजक व नुकताच प्रदर्शित झालेले सीमाभागातील गौरवगीत ‘अखंड महाराष्ट्राचा लढा ‘ या गीताचे गीतकार म्हणून सीमाकवी रवींद्र पाटील यांचा साहित्य अकादमीचे पुरस्कार विजेते लेखक डॉ. किरण गुरव व शिवाजी विद्यापीठ मराठी विभाग प्रमुख डॉ.नंदकुमार मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

रवींद्र पाटील हे चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष असून राजर्षी शाहू विद्यालय शिनोळी बु. येथे उपक्रमशिल , तंत्रस्नेही अध्यापक म्हणून कार्यरत आहेत . रवींद्र पाटील हे ‘कोजिम प्रेरणा पुरस्काराने सन्मानित आहेत .
आज कोजिम प्रेरणा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला . यावेळी अध्यक्षस्थानी नंदकुमार मोरे होते.

यावेळी व्यासपीठावर कोजिम अध्यक्ष राजेंद्र पाटील , पी डी पाटील , विजय सरगर ,नेताजी डोंगळे , सोनल गाडेकर , मनिषा डांगे , कोजिमचे समन्वयक संजय साबळे , तालुका समन्वयक महादेव शिवणगेकर , बाबुराव पाटील , हणमंत पाऊसकर , कमलेश कर्णिक व कोल्हापूर जिल्हातील मराठी अध्यापक मान्यवर उपस्थित होते .


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24