लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून जारी करण्यात आलेल्या गाईडलाईन्स प्रमाणे राजकीय नेत्यांना आपले फोटो प्रसिद्ध करता तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणाऱ्या आचारसंहितेच्या काळात आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडेपर्यंत वेबसाईटवरून राजकीय नेत्यांना आपले फोटो काढून टाकावे लागणार आहेत.
या संदर्भातील आदेशात केंद्रीय निवडणूक आयोगाने देताना प्रशासकीय विभागांचा विचार करून येताना फोटो हटविण्याचे आदेश दिले आहेत त्याच्या काही दिवसातच लोकसभा निवडणूक जाहीर होऊ शकते.
तसेच कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणुकीची घोषणा सुद्धा केली जाऊ शकते त्यामुळे अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने निवडणूक आयोगाने हा आदेश दिला आहे.
सध्या लोकसभा निवडणूक जवळ आली असल्याने राजकीय नेत्यांचे एकमेकांवर होणारे आरोप प्रत्यारोपचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तसेच निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वर्तुळात राजकीय घडामोडींना सुद्धा वेग आला आहे.