लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे बेळगाव जिल्ह्यात 7 मे रोजी मतदान होणार असून आचारसंहिता लागू झाली आहे.तर 4 जून रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार गुप्ता यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे.
बहुप्रतिक्षित लोकसभा निवडणुकीची जाहीर निवडणूक आयोगाने केली आहे निवडणूक आयोगाने आज 2024 ते 2019 या कालावधीसाठी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केले आहेत. देशातील एकूण 543 मतदार संघासाठी ही निवडणूक होणार आहे.
कर्नाटक मध्ये 26 एप्रिल ला दुसऱ्या टप्प्यात आणि सात मे रोजी चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे तर दक्षिण कर्नाटकात 26 एप्रिल ला आणि उत्तर कर्नाटक सात मे रोजी निवडणुका होणार आहेत. चार जून रोजी देशभरात मतमोजणी होणार आहे.
लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा 21 राज्यांमध्ये 19 एप्रिल दुसरा टप्पा 26 एप्रिल आणि तिसरा टप्पा सात मे रोजी होणार आहे चौथ्या टप्प्यासाठी 13 मे रोजी आणि पाचव्या टप्प्यासाठी 20 मे रोजी मतदान होणार आहे. 25 मे रोजी सहा आणि फेज एक जून रोजी होणार आहे.
एकूण लोकसभा निवडणूक सात टप्प्यात होणार आहे
सध्याचा लोकसभेचा कार्यकाळ सोळा जून रोजी संपणार आहे. तत्पूर्वी चार जून रोजी देशभरात मतमोजणी निकाल जाहीर होणार आहे.