This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*एलआयसी ऑफ इंडियाने नवीन योजना “एलआयसीचा जीवन उत्सव (प्लॅन क्र. 871)” सादर*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

एलआयसी ऑफ इंडियाने नवीन योजना “एलआयसीचा जीवन उत्सव (प्लॅन क्र. 871)” सादर केली असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत एलआयसीच्या व्यव्यस्थापकानी पत्रकार परिषदेत दिली.

https://fb.watch/oE5NhxI-5d/?mibextid=9R9pXO

यावेळी बोलताना चेअरपर्सन, सिद्धार्थ मोहंती, म्हणाले की भारतीय आयुर्विमा महामंडळ यांनी 29.11.2023 पासून एलआयसीचा जीवन उत्सव ही नवीन योजना सुरू केली आहे एलआयसीचा जीवन उत्सव हा वैयक्तिक, बचत, संपूर्ण जीवन विमा योजना आहे. ही एक मर्यादित प्रीमियम योजना आहे .ज्यामध्ये संपूर्ण प्रीमियम भरण्याच्या कालावधीत हमी जोडता येते .

LIC च्या जीवन उत्सव योजनेसाठी अद्वितीय ओळख क्रमांक (UIN) 512N363V01 आहे.

कोणाला आणि कधी पर्यंत करता येऊ शकते हि पॉलिसी

ही योजना 90 दिवसांपासून ते 65 वर्षांपर्यंतच्या वयासाठी उपलब्ध आहे.

गॅरंटीड लाईफ लॉन्ग इनकम आणि लाईफ लाँग रिस्क कव्हर देते.

किमान प्रीमियम भरण्याची मुदत 5 वर्षे आणि कमाल प्रीमियम भरण्याची मुदत 16 वर्षे आहे.

प्रत्येक पॉलिसी वर्षासाठी ज्यासाठी प्रीमियम भरला जातो, हमी जोडणी @ रु. 40 प्रति हजार मूळ विमा रक्कम प्रत्येक पॉलिसी वर्षाच्या शेवटी प्रीमियम भरण्याच्या कालावधीत जमा होईल.

प्रीमियम भरण्याच्या मुदतीनंतर लाइफ अॅश्युअर्ड टिकून राहिल्यावर, पॉलिसीधारक खालीलपैकी निवडू शकतो:

पॉलिसीच्या अटी व शर्तींच्या अधीन राहून. एलआयसी अशा डिफर्ड फ्लेक्सी इन्कम पेमेंटवर वार्षिक चक्रवाढ दराने 5.5% दराने व्याज देईल. पॉलिसीधारकाला संपूर्ण आयुष्यासाठी लाइफ कव्हर ऑफर केले जात असल्याने, मृत्यू लाभ खालीलप्रमाणे देय असेल:

जोखीम सुरू झाल्याच्या तारखेनंतर लाइफ अॅश्युअर्डच्या मृत्यूवर, पॉलिसी अंमलात असल्यास, जमा झालेल्या गॅरंटीड अॅडिशन्ससह “मृत्यूवर विमा रक्कम” च्या बरोबरीचा मृत्यू लाभ देय असेल.

हा मृत्यू लाभ मृत्यूच्या तारखेपर्यंत भरलेल्या एकूण प्रीमियमच्या 105% पेक्षा कमी नसावा.

“मृत्यूवर विमा रक्कम” ही ‘मूलभूत विमा रक्कम’ किंवा ‘वार्षिक प्रीमियमच्या 7 पट आहे, यापैकी जे जास्त असेल ते मॅच्युरिटी लाभ या योजनेअंतर्गत उपलब्ध नाही कारण नियमित/फ्लेक्झी उत्पन्न लाभ वापरलेल्या पर्यायानुसार आयुष्यभर चालू ठेवले जातात.अशी ही एलआय सी ची नवीन जीवन उत्सव पॉलिसी असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now