एस के ई सोसाइटी च्या जी एस एस पी यु काॅलेज च्या वतीने सागरी दळणवळण आणि करिअरची संधी विषयावर व्याख्यान
कॅप्टन धनंजय परूळेकर यांनी समुद्री दळणवळणात नोकरीची संधी, या विषयी आपल्या भागातील विद्यार्थी अवगत नाही, त्यांना याची सखोल माहिती ,या क्षेत्रात उतरतेवेळी येणारी आव्हाने, त्यातून योग्य निवडक प्रक्रियेचा स्विकार,सावलंबन,जीवनात विशेष प्राविण्य प्राप्त करण्यासाठी लागणारे सामर्थ्य ,त्यासाठी लागणारी तैयारी ,कशाप्रकारे आपन या प्रक्रियेसाठी सज्ज रहावे इत्यादीशी निगडीत चर्चा झाली.
या कार्यशाळेसाठी एस के ई सोसाइटीचे अध्यक्ष श्री व्ही एल अजगांवकर, व्हाईस चेअरमन श्री एस वाय प्रभू,श्री अशोक शानभाग, उप प्राचार्य सचिन पवार उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात श्री एस वाय प्रभू यांनी जीवनात कठोर परिश्रम आणि आपल्या कार्यात आनंद राखून कार्य केल्यास यश हे प्राप्त होते असे उद्गार व्यक्त केले. उप प्राचार्य सचिन पवार यांनी आभार व्यक्त केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ.अजित कोळी यांनी केले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीता ने करण्यात आली.