This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

March 2024
S M T W T F S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

| Latest Version 9.4.1 |

Local News

कंग्राळी खुर्द मराठी शाळा एसडीएमसी अध्यक्ष उपाध्यक्षांची बिनविरोध निवड

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

कंग्राळी खुर्द मराठी शाळा एसडीएमसी अध्यक्ष उपाध्यक्षांची बिनविरोध निवड

॥ कंग्राळी खुर्द मराठी शाळा एसडीएमसी अध्यक्षपदी मोनेश्वर पाटील तर उपाध्यक्षपदी सुनिता पाटील ॥
पालक व सीएसी कमिटी एकमताने एसडीएमसी बिनविरोध निवड
कंग्राळी खुर्द – येथील मराठी शाळेला एसडीएमसी अध्यक्षपदी मोनेश्वर पाटील तर उपाध्यक्ष पदी सुनिता पाटील यांची निवड झाली असून पालक व सी ए सी कमिटी च्या एकमताने एसडीएमसी निवड बिनविरोध करण्यात आली .
ग्राप अध्यक्ष यल्लापा पाटील यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सुरवातीला शालेय प्रशासनाने सर्वांचे स्वागत केले . त्यानंतर उपस्थित सर्व पालकांना एसडीएम सी चे निकष सांगून इच्छूकांची नावे घेण्यात आली एकूण 18 जागांसाठी 10 पुरुष तर 11 महिला इच्छूक होत्या . सीएसी कमिटीने बिनविरोध साठी आवाहन केले त्यानुसार निकषांत न बसणार्यां एक पुरुष तर 2 महिला उमेदवारांनी माघार घेतली त्यामुळे एकूण 18 जणांची कमिटी बिनविरोध घोषित करण्यात आली . त्यानंतर लागलीच अध्यक्ष व उपाध्यक्ष या निवडीही बिनविरोध झाल्या अध्यक्ष म्हणून श्री मोनेश्वर पाटील तर उपाध्यक्ष म्हणून सौ सुनिता पाटील यांची निवड झाली . कामटीतील अन्य सदस्य पुढील प्रमाणे . बाबू पावशे , परशराम पाटील , अनिल पाटील , भाऊ पाटील , प्रभू पाटील , रणजित पाटील , मल्लापा कंग्राळकर , विनायक पाटील , मिनाक्षी मुतगेकर , पौर्णिमा मोहिते , शितल सुतार, तेजस्वीनी पाटील , लक्ष्मी उंडाळे , प्रिती पाटील , रेणूका कातकर , ज्योती पाटील सचिव – अशोक कोलकार, शिक्षक प्रतिनिधी जे एस पाटील
या निवडी नंतर ग्राप सदस्य प्रशांत पाटील व अध्यक्ष यल्लापा पाटील यांनी शुभेच्छा देऊन चांगले काम करून शाळेची गुणवत्ता वाढवूया एकमेकांच्या सहकार्याने विद्यार्थी हित साधूया असे आवाहन केले . नुतन अध्यक्षानी शाळा गुणवत्ता वाढीसाठी सर्वोतपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले . निवडी नंतर ग्राप च्या वतिने नुतन अध्यक्ष , उपाध्यक्ष व सदस्यांचा सत्कार करण्यात आला . या बिनविरोध निवडी साठी वरील मान्यवरांसह सीएसी सदस्य वैजनाथ बेन्नाळकर , कल्लापा पाटील , राकेश पाटील , यशोधन तुळसकर , विनायक कम्मार , सदस्या लता पाटील , मिना मुतगेकर , रेखा पावशे , सुनिता जाधव यांनी सहभाग घेतला . यावेळी जवळपास सर्व पालक , शिक्षण प्रेमी नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाटील सरानी केले .


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now