ज्ञानसागर इंग्लिश मिडीयम स्कुल, येळ्ळूरचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
येळ्ळूर, दिनांक 19 : जनसेवा मित्रमंडळ संचलित ज्ञानसागर इंग्लिश मिडीयम स्कुल, येळ्ळूर या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन सैनिक भवन सभागृहात उत्साहात संपन्न झाले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चाचे माजी चिटणीस किरण जाधव, येळ्ळूर क्लस्टरचे सीआरपी महेश जळगेकर, बेळगाव महापालिकेच्या माजी उप महापौर मीना वाझ, बेळगाव जिल्हा बुद्धीबळ संघाचे सचिव आणि ज्येष्ठ राष्ट्रीय परीक्षक गिरीश बाचीकर, एमएचपीएस सुळगे-येळ्ळूर शाळेच्या सेवानिवृत्त मुख्याद्यापिका शकुंतला कुंभार, सामाजिक कार्यकर्त्या शारदा भेकणे, कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशनचे सचिव आणि ज्येष्ठ स्केटिंग प्रशिक्षक सुर्यकांत हिंडलगेकर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन रवींद्र जाधव होते.
प्रारंभी शाळेच्या प्राचार्या इंद्रायणी जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. पाहुण्यांचा गुलाब पुष्प ,शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. शिक्षिका संध्या खाडे यांनी वार्षिक आढाव्याचे वाचन केले. किरण जाधव, मीना वाझ आणि ईतर पाहुण्यांनी दीप प्रज्वलित केला. उत्कृष्ट सीआरपी म्हणून पुरस्कार मिळाल्याबद्दल महेश जळगेकर यांचा ज्ञानसागर स्कुल परिवाराकडून शाल, श्रीफळ आणि समानपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच 20 वर्षे प्रदीर्घ सेवा बजावून निवृत्त झालेल्या शकुंतला कुंभार या एमपीएससी सुळगे मराठी शाळेच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेचाही यावेळी यथोचित सन्मान करण्यात आला.
शाळेची या वर्षाची सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी म्हणून आराध्या यशवंत जाधव हिचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी किरण जाधव, महेश जळगेकर यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. वार्षिक क्रीडा स्पर्धेत आणि केंद्रात झालेल्या स्पर्धेत घवघवीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी पदक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. पारितोषिक वितरण समारंभाचे सूत्रसंचालन शिक्षिका उज्वला लाड यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती मासेकर यांनी केले. साहाय्यीका सुमन संताजी यांनी आभार मानले.
यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम झाला. विद्यार्थी-विद्यार्थिनींनी विविध गीतावर नृत्य सादर केले. कार्यक्रमाला पालक बहुसंख्येने उपस्थित होते.