१५-२-२०२४ रोजी दुपारी ४ वाजता सुरू झालेल्या शानदार कार्यक्रमात १२ महिलांचा अधिकार ग्रहण समारंभ पार पडला. दीपप्रज्वलन व स्वागत गीता नंतर मुख्य कार्यक्रम सुरू झाला.
प्रमुख वक्त्या म्हणून सौ सुनिता पाटणकर यांनी राजमाता जिजाऊंबद्दल आपले अभ्यासू मत मांडले. त्यानंतर दुसर्या वक्त्या सौ मनिषा नेसरकर यांनी समाजातील स्त्रीचे स्थानमान व कर्तव्य यावर आपले परखड विचार व्यक्त केले. स्वागताध्यक्ष जिजाऊ ब्रिगेडच्या संस्थापिका डॅा सोनाली सरनोबत यांनी ई. स. २००० साली आपण राजमाता जिजाऊ सांस्कृतिक प्रतिष्ठान स्थापन करून नोंदणी केली परंतू मूर्तस्वरूप यायला बराच वेळ लागला असे नमुद केले. हे राजकिय व्यासपिठ नसून समाजकल्याण व संस्कृती संवर्धन यावर आपला भर राहील. महिलांवरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही. प्रत्येक जिल्हा व राज्यात शाखा सुरू करण्याचा मानस बोलून दाखवला.
सध्या बेळगांव जिल्ह्यात पाच अध्यक्षा अनुक्रमे
सौ कांचन चौगुले, सौ गीतांजली चौगुले, सौ नम्रता हुंदरे, श्रीमती आशाराणी निंबाळकर, सौ. निना काकतकर यांची नेमणुक झाली आहे. सचीव म्हणून सौ मंगल पाटील, सौ निशिता कदम, सौ चंद्रा चोपडे, सौ लक्ष्मी गौंडाडकर या काम पहातील. उपाध्यक्षा म्हणून सौ.दिपाली मलकारी, सौ स्वाती फडके व सौ वृषाली मोरे यांना जबाबदारी दिली आहे.
श्री किशोर काकडे यांनी बहारदार निवेदन करून कार्यक्रमाला रंगत आणली.
सरतेशेवटी तिळगुळ देऊन हळदीकुंकू कार्यक्रम पार पडला.
तिनशे महिलांचा सहभाग होता.