बेळगांव:भारताची राज्यघटना लिहिलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोणत्याही कार्यक्रमाला अनुपस्थित राहण्याचे काम नगरसेवक रवी धोत्रे करताहेत. त्यांना डॉ बाबा साहेब आंबेडकरांची जयंती, भीमा कोरेगाव शौर्य दिन , दलित संघटनांचा कार्यक्रम याशिवाय अन्य कोणत्याही कार्यक्रमांना बोलावले असता नगरसेवक टाळाटाळ करत असल्याचा आरोप आज सफाई कर्मचारी कवलू समितीच्या सदस्यांनी महानगरपालिकेमध्ये निवेदनाद्वारे केला. या बरोबर आपल्या अन्य मागण्याही रवी धोत्रे सांगून सुद्धा पूर्ण करत नसल्याचा आरोप करण्यात आला.
जाणून बुजून नगरसेवक रवी धोत्रे हे आपल्या वार्डातील इतर कार्यक्रमाकरिता जातात मात्र दलित नागरिकांच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहण्याचे काम ते करताहेत.
त्यांना दलित नागरिकांचा बहुदा पोटशुळ असावा म्हणून ते कार्यक्रमाला टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करतात असा आरोप यावेळी करण्यात आला आणि त्यांच्या विरोधात तक्रार सुद्धा महापालिकेमध्ये करण्यात आली.
त्यावेळी रवि धोत्रे या नगरसेवकाचा धिक्कार असो आम्हाला मूलभूत सुविधा पुरवा यासह अन्य घोषणा नगरपालिकेमध्ये सफाई कर्मचारी कवलू समितीच्या सदस्यांनी दिल्या. आणि आपल्या मागणीचे निवेदन पालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांना दिले.
तसेच एसी एस टी फंड चा उपयोग दुसऱ्या कामांसाठी केला जात असल्याचा आरोप देखील करण्यात आला.तसेच नागरीक कोणतीही कामे सांगितल्यास त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला .येथील पी के क्वाटर्स मध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आहे त्यामुळे आपल्याला ड्रेनेज गटारी ,सरकारी सौचालय चा दरवाजा बसवून देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली