बेळगावात आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी दिली.
मालिनी सिटी बेळगाव येथे आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव येत्या 20 जानेवारी पासून सुरु होणार आहे एकूण चार दिवस शहरांमध्ये पतंग महोत्सव पार पडणार आहे. या दिवसांमध्ये विविध कार्यक्रम देखील होणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या महोत्सवात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विदेशी 10 आणि 32 जन भारतीय विविध राज्यातील पतंग उडवणारे तज्ञ मंडळी या उत्सवात सहभागी होणार असल्याचे देखील सांगितले.
या उत्सवात भाषण आणि फॅशन शो नृत्य सोलो,समूह नृत्य करण्यात आले आहे. तसेच अयोध्येतील श्रीराम प्रतिष्ठापना निमित्त सोमवार दिनांक 22 जानेवारी रोजी भव्य क्रॅकर शो देखील करणार असल्याची माहिती दिली.