This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsSports

आंतर विभाग शिक्षकांच्या क्रिकेट स्पर्धाला प्रारंभ.

आंतर विभाग शिक्षकांच्या क्रिकेट स्पर्धाला प्रारंभ.
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आंतर विभाग शिक्षकांच्या क्रिकेट स्पर्धाला प्रारंभ.

 

बेळगाव तारीख 13 टिळकवाडी येथील वव्क्सिन डेपो मैदानावर टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटना व क्रीडाभारती बेळगाव यांच्या संयुक्त विद्यामानाने बेळगाव शहर माध्यमिक आंतर विभाग शिक्षकांच्या टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ झाला सदर स्पर्धेत 5 संघानी भाग घेतला आहे.

सकाळी स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव शहराचे गटशिक्षणाधिकारी अधिकारी रवी बजंत्री , शहराच्या पीईओ जहिदा पटेल,क्रीडाभारतीचे राज्याध्यक्ष मुकुंद किल्लेकर, सचिव अशोक शिंत्रे, पुरस्कर्ते साईराज बिल्डरचे उद्योजक महेश फगरे ,हनुमान स्पोर्ट्स संचालक आनंद सोमण्णाचे,क्रीडाभारती उत्तर कर्नाटकचे सहसचिव विश्वास पवार,टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष विवेक पाटील, सचिव एच बी पाटील माध्यमिक शिक्षक संघटनेचे सचिव उमेश कुलकर्णी, मालतीबाई साळुंखे शाळेचे मुख्याध्यापक के एम मन्नोळकर, आदी मान्यवर उपस्थित होते,

प्रारंभी विनायक डिचोलकर यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले, पाहुण्यांच्या हस्ते भारत माता फोटोचे पूजन करण्यात आले याप्रसंगी विवेक पाटील ,एच बी पाटील ,जयसिंग धनाजी ,प्रवीण पाटील, बापू देसाई यांनी उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले,उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंना मार्गदर्शन पर भाषण केले विद्यार्थ्यांना शारीरिक मार्गदर्शन करताना शिक्षकांनी सुद्धा शारीरिक तंदुरुस्ती जपणे अत्यंत महत्त्वाचे असे मनोगत शहराचे गटशिक्षणाधिकारी रवी बजंत्री केले.यानंतर महेश फगरे, आनंद सोमण्णाचे यांनी यष्टीपूजन व अशोक शिंत्रे, रवी बजंत्री यांच्याहस्ते श्रीफळ वाढून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत टिळकवाडी विभाग ,गोमटे स्कूल टिळकवाडी ,शहापूर विभाग, कँप विभाग, उत्तर विभाग संघांनी भाग घेतला आहे.

याप्रसंगी चंद्रकांत पाटील परशराम मंगनाईक, संजीव नाईक ,मोहन पत्तार, बसवराज होसमठ ,नागराज भगवंतण्णावर , नितीन नाईक प्रमोद जपे, प्रभाकर कंगराळकर, संजीव रेहमानवाले, रामलिंग परीट, संतोष दळवी, उमेश बेळगुंदकर, देवकुमार मंगणाकर ,अश्विन पाटील, निखिल कदम ,देवेंद्र कुडची, श्रीधर,श्रीहरी लाड ,विठ्ठल मुळकूर, महावीर जनगौडा, व विविध विभागातील शिक्षक व क्रीडाशिक्षक उपस्थित होते.

 


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24