हिवाळी अधिवेशनच्या तयारीची पाहणी
आज सकाळी सुवर्ण विधानसौद येथे कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष यु .टी .खादर आणि विधान परिषदेचे सभापती बसवराज होती. यांनी विधानसभेची पाहणी केली. त्यांच्या या पाहणी दरम्यान त्यांनी कोणत्या ठिकाणी समस्या उद्भवले आहेत याची माहिती घेतली.
तसेच पाहणीनंतर पत्रकारांशी बोलताना खादर यांनी सरकारची चर्चा केल्यानंतरच येणाऱ्या अधिवेशनाची तारीख जाहीर केली जाईल असे सांगितले. त्याचबरोबर त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या असल्याची देखील माहिती दिली.
कर्नाटक राज्य विधिमंडळाच्या बेळगाव येथील अधिवेशनाची तारीख अजून जाहीर झालेली नाही मात्र ती आता लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे सदर अधिवेशन येणाऱ्या चार डिसेंबर पासून सुरू होईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
राज्य सरकारची चर्चा केल्यानंतरच अधिवेशनाची तारीख निश्चित केली जाईल असे यावेळी बोलताना खादर यांनी सांगितले. असेच त्यांनी हिवाळी अधिवेशनाच्या दृष्टीने सुवर्णा सौधची तयारीची पाहणी करत असल्याची माहिती यावेळी तसेच तारीख निश्चित झाल्यावर आपण सर्वजण पुन्हा बेळगावला भेट देणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
तसेच याप्रसंगी बोलताना होरटी देखील म्हणाली की संप करणाऱ्यांना मी आवाहन करतो की त्यांनी संप टाळावे ज्यामुळे अधिवेशनाचे कामकाज सुरळीत आणि प्रभावी होण्यास मदत होईल संप करणाऱ्यांनी संबंधित मंत्र्यांची भेट घेऊन त्यांचे प्रश्न मांडावेत. अधिवेशन काळात आंदोलन अधिक तीव्र करू नये त्यामुळे कोणाचीही गैरसोय होणार नाही आंदोलकांना संबंधित मंत्रालय भेटून त्यांच्या मागण्या मांडण्याचे आवाहन केले जाईल आणि सरकार त्यावर तोडगा काढू शकेल असे यावेळी सांगितले.
याप्रसंगी बेळगाव उत्तरचे आमदार असिफ राजू सेठ जिल्हाधिकारी नितेश पाटील पोलीस आयुक्त सिद्रामप्पा कर्नाटक विधान परिषद आणि विधानसभेचे वरिष्ठ अधिकारी जिल्हा पंचायतचे सीईओ हर्षल गोयल यांच्यासह अन्य उपस्थित होते