चलवेनहट्टी येथे सालाबादप्रमाणे यावर्षीही ब्रम्हलिंग देवस्थानच्या इंगळ्या उत्सव आयोजित करण्यात आला आहे.माघ कृष्ण पौर्णिमा शनिवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ४-०० वाजता इंगळ्याचा कार्यक्रम होणार आहेत यावेळी समस्त भाविकांना दर्शनसाठी देव पालखीत विराजमान होत मंदिरच्या प्रदक्षिणा घातल्या जातील .
त्यानंतर भाविकांडून नवस फेडण्यासाठी श्रीफळांचा वर्षाव केला जाईल अशा सर्व विधी पाडल्यानंतर देवाला गाऱ्हाणे घालत इंगळ्याना सुरुवात करण्यात येतील त्यापुर्वी मंदिरात पूजा अर्चासह सर्व विधी पार पाडल्या जाणार आहेत यावेळी मोठ्या प्रमाणात भाविकांची उपस्थिती असते त्यामुळे वरील नियोजन प्रमाणे इंगळ्या उत्सव पार पडेल तरी समस्त भाविकांनी नोंद घ्यावी