This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*बेळगाव बार असोसिएशन तर्फे स्वातंत्र्य दिन साजरा*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव बार असोसिएशन तर्फे स्वातंत्र्य दिन साजरा

बेळगाव: आपल्या देशाचा 77 वा स्वातंत्र्य दिन बेळगाव जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी असोसिशनचे प्रभारी अध्यक्ष ॲड सुधीर बी चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बेळगाव जिल्हा प्रधान सत्र न्यायाधीश श्रीमती एल विजय लक्ष्मीदेवी या उपस्थित होत्या.

प्रारंभी बार असोसिएशन सेक्रेटरी ॲड गिरीराज पाटील,जॉइंट सेक्रेटरी ॲड बंटी कपाई ,सदस्य वकील महांतेश पाटील, ॲड आदर्श पाटील, ॲड प्रभाकर पवार,ॲड पूजा पाटील यांच्या वतीने महात्मा गांधीजी व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

तसेच जिल्हा प्रधान न्यायाधीश एल विजयालक्ष्मीदेवी यांच्या शुभहस्ते तिरंगा ध्वजाची पूजन करण्यात आले. याप्रसंगी बेळगाव जिल्हा न्यायालयातील सर्व माननीय न्यायाधीश व पदाधिकारी मंडळी कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now