बेळगाव ता,5. लिंगराज कॉलेजच्या कॅम्पस मधील केएलई संस्थेच्या जलतरण तलाव व फॅशनेट जलतरण स्पोर्ट्स अकादमी यांच्यावतीने मतदान जनजागृतीसाठी कॉलेजच्या आवारात व परिसरात मतदान जनजागृती रॅली करीत जनतेला शंभर टक्के मतदान करा असा संदेश देण्यात आला.
प्रशासनाच्यावतीने स्वीप समितीच्या माध्यमातून मतदारांत यापूर्वी जागृती करण्यात आली आहे, आज रविवार तारीख 5 रोजी सकाळी 8.00 वाजता येत्या 7 मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सर्व मतदारांनी मतदान करावे असे आव्हान करत फॅशनेट जलतरण क्लबचे मुख्य एनआयएस जलतरण प्रशिक्षक शाम मलाई यांच्या नेतृत्वाखाली जलतरणपटू व पालक वर्गाने.,मी मतदान करणार तुम्हीही मतदान करा,
,मतदान तुमचा हक्क मतदान करण्यास विसरू नका.
पाहता पाहता आला, निवडणुकीचा अंतिम टप्पा, गल्लीपासून दिल्लीपर्यंत मतदानासाठी शंभर टक्के मतदान करा, अशा घोषणा देत परिसरात जनजागृती करण्यात आली याप्रसंगी.एनआयएस जलतरण प्रशिक्षक संदीप मालाई, पूजा होनगेकर ,योगेश मालाई ,प्रशांत पाटील, शर्मिष्ठा मालाई, सचिन कुरुंदवाड, मनोज जाधव ,वरूण बल्लोळी, वीरू गवळी, पिराजी पाटील, सारंग देशपांडे,सुरज मंगण्णाकर,प्रशांत बल्लोळी, प्रवीण पाटील, व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.