बेळगांव: आमदार सतीश जारकीहोळी यांच्या निधीतून विविध विकास कामाला चालना युवा काँग्रेस नेते राहुल जारकीहोळी यांच्या हस्ते करण्यात आले.
युवा काँग्रेस समिती राहुल जारकीहोळी यांनी कर्नाटक सरकार सार्वजनिक बांधकाम मंत्री व बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या सूचनेनुसार यमकनमर्डी मतदार संघातील कडोली जिल्हा पंचायत व्याप्तीत येणाऱ्या गुंजेनट्टी क्रॉस ते हांद्दिग्नुर पर्यंत सुमारे 5 कोटी मंजूर झाले असून रस्त्याच्या कामाला चालना देण्यात आली.त्यानंतर केदनुर गावातील श्री लक्ष्मीदेवी यात्रेमध्ये सहभाग घेतला ग्रामदेवीचा आशीर्वाद घेतला.
कडोली ते आगसगे गावापर्यंत एकूण 3 कोटी 65 लाख खर्च रस्ता डांबरीकरण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच जाफरवाडी ते गौंडवाड गावापर्यंतच्या डांबरीकरणासाठी 65 लाख रुपये झाले असून रस्ता डांबरीकरणच्या कामाला शुभारंभ करण्यात आला.