बेळगाव येथील गोगटे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड ने पिन्स आणि लेन्स गेम झोन चे उद्घाटन हॉटेल मेरियेट जवळील गोगटे प्लाझा येथे केले.
यावेळी या गेम्सच्या उद्घाटनाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी त्यांच्या हस्ते गेमचे उद्घाटन करण्यात आले
. या उदघाटन कार्यक्रमाला कर्नाटक राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर उपस्थित होत्या. गेम्सचे उद्घाटन केल्यानंतर रितेश देशमुख जेनेलिया आणि त्यांच्या मुलांनी खेळाचा आनंद लुटला.त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला