कंग्राळी बुद्रुक येथे नेट क्रिकेट प्रॅक्टिस ग्राउंडचे उद्घाटन
बेळगांव:युवकांमध्ये असलेल्या कलागुणांना वाव मिळावा तसेच ते व्यसनापासून दूर व्हावेत आणि आपल्या गावाचे नाव उज्वल करावे या हेतूने कंग्राळी बुद्रुक मध्ये काल युवकांकरिता ग्रामपंचायत सदस्य यल्लोजीराव पाटील आणि मारुती पाटील यांनी क्रिकेट प्रॅक्टिस करिता युवकांना नेट देऊ केले आहे.
कंग्राळी बुद्रुक गावामध्ये लक्ष्मीपूजनाच्या शुभ दिनी युवकांना व्यसनापासून दूर ठेवण्याकरिता आणि त्यांची शारीरिक तंदुरुस्ती वाढविण्याकरिता युवकांना क्रिकेट प्रॅक्टिस करण्याकरिता नेट ग्राउंड ला नेट देऊ केले आहे.
लक्ष्मी पूजना दिवशी नेटचे पूजन करण्यात आले. जवळपास 80 हजार रुपये खर्च करून यल्लोजीराव पाटील आणि मारुती पाटील यांनी क्रिकेट ग्राउंड ला नेट दिले. तसेच क्रिकेट किटचे पुजन करुन व नेट प्रॅक्टिस ग्राउंडचे उद्घाटन केले.