जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत व पशुपालन आणि पशुवैद्यकीय सेवा खाते बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मुचंडी येथे स्थलांतरित नूतन पशुचिकित्सालयाचे उद्घाटन सार्वजानिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते करण्यात आले.
येथील हनुमान चौक, मुचंडी येथे सकाळी १० वाजता झालेल्या कार्यक्रमास पशुसंगोपन विभागाच्या सलमा फईम तसेच प्रादेशिक आयुक्त संजय शेट्टणावर, उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक विकाशकुमार विकाश, जिल्हाधिकारी नितेश पाटील, पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा, जिल्हा पोलीसप्रमुख भीमाशंकर गुळेद, जि. पं. कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, पशुपालन खात्याचे आयुक्त मंजुनाथ सालीमठ, डॉ. बी. एल. परमेश्वर नायक, डॉ. राजीव कुलेर व डॉ. आनंद पाटील उपस्थित होते.