बेळगाव :दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित भाऊराव काकतकर महाविद्यालयात जिमखाना व भिंतीपत्रकाचे उद्घाटन झाले. या उद्घाटनाला प्रमुख वक्ता म्हणून राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या माजी विभाग प्रमुख डॉ विनोद गायकवाड आणि सायकलींग प्रशिक्षक निकिता पाटील हे उपस्थित होते.
डॉ विनोद गायकवाड यांनी आपल्या भाषणात मोबाईलच्या युगात वाचन संस्कृती लोकपाबत चालली आहे. तिची जोपासना कशी केली पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले .निकिता पाटील यांनी खडतर मार्गक्रम करत आपण प्रशिक्षक कसे बनलो याची प्रेरणा दिली.या कार्यक्रमाची सुरुवात निकिता आणि सानिका यांच्या स्वागत गीताने झाली. प्रास्ताविक आणि स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस.एन. पाटील यांनी केले.पाहुण्यांचा परिचय प्राचार्य सुनील ताटे, यांनी केले अध्यक्षीय भाषण संस्थेचे सचिव प्राचार्य विक्रम पाटील यांनी केले.तर विद्यार्थी प्रतिनिधी गौतम पटवर्धन यांनी आभार मानले.