This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

February 2024
S M T W T F S
 123
45678910
11121314151617
18192021222324
2526272829  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsSports

*मराठा मंडळ सेंट्रल स्कूल मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन*

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतच असतात मात्र त्यांना त्यांच्यातील असलेले कला गुण त्यांच्यामध्ये असलेली खेळाडू वृत्ती बाहेर यावी याकरिता मराठा मंडळ सेंट्रल हायस्कूल मध्ये वार्षिक क्रीडा उत्सव आयोजित करण्यात आला होता.

मराठा मंडळ सेंट्रल हायस्कूल मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव आज पार पडला.यावेळी या क्रीडा उत्सवाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते ऑलम्पिक ध्वजाचे ध्वजारोहण करून करण्यात आली.त्यानंतर सरस्वती फोटो पूजन व हिंदूंचे आराध दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन तसेच दिपप्रज्वलन करून क्रीडा महोत्सवाला चालना देण्यात आली.

या क्रीडा महोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नागराजू ,पी.इ.ओ जी पी पटेल ,शाळेचे माजी विद्यार्थी व राष्ट्रीय कुस्तीपटू सुनील ठाणब ,निवृत्त जवान रामचंद्र पाटील,राष्ट्रीय कुस्तीपटू अतुल शिरोळे उपस्थित होते.

क्रीडा महोत्सवाची सुरुवात झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी क्रीडा शपथविधी घेतली आणि त्यानंतर देसी खेळ मलखांब व लाठी खेळचे सादरीकरण मान्यवरांच्या समोर केले.

यावेळी बोलताना मराठा मंडळाचे अध्यक्षा राजश्री नागराजू यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी त्या म्हणाल्या की विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच खेळ देखील खेळले पाहिजे खेळांनी आपले आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. अभ्यास करत असतानाच आपण अधून मधून खेळ खेळले पाहिजे असे मत व्यक्त केले आणि सर्वांना मार्गदर्शन केले.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व्ही.एस.हसबे ,जिजामाता हायस्कूलचे मुख्याध्यापक एन.डी.पाटील मराठा मंडळ हायस्कूलच्या मुख्याध्यापका शिंदे तसेच शाळेचे पंतप्रधान गगन त्यासह शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24