शांताई वृद्धाश्रमाचे अध्यक्ष विजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शांताई वृद्धाश्रमातील जय भारत फाउंडेशन पुरस्कृत महिलांच्या ‘बी’ विंगचा उद्घाटन समारंभ गुरुवारी दुपारी उत्साहात पार पडला.
याप्रसंगी उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुण्या म्हणून महिला व बालकल्याण, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक सक्षमीकरण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर , एपीएमसी व बुडाचे माजी अध्यक्ष युवराज कदम आणि अशोक आयर्न ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक जयंत हुंबरवाडी उपस्थित होते.
प्रारंभी पाहुण्यांचे स्वागत झाल्यावर मंत्री हेब्बाळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन, तसेच आश्रमातील महिला ‘बी’ विंगचे उद्घाटन करण्यात आले. त्याचप्रमाणे जयंत हुंबरवाडी यांच्या हस्ते अतिथीगृहाचा कोनशिला समारंभ पार पडला. आपल्या समायोचीत भाषणात मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी शांताई वृद्धाश्रमाच्या कार्याचा गौरव केला.
यावेळी हेब्बाळकर यांचा मारिया मोरे व आश्रमातील आजींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.समारंभास शांताई वृद्धाश्रमाचे कार्यकारी अध्यक्ष माजी महापौर विजय मोरे, आनंद देसाई, प्रवीण दोड्डनावर विश्वनाथ सामंत, राजेंद्र हरकुनी, निलेश कोचा, बसवनगौडा पाटील बामणवाडी जय भारत फाउंडेशनचे संचालक समीर कणबर्गी, उद्योजक कीथ मचाडो, दिलीप चिटणीस, सिद्धार्थ हुंदरे, ग्रा.पं. उपाध्यक्ष शकुंतला हणबर, सदस्य प्रियांका पाटील, वर्षा डुकरे उपस्थित होते.