बेळगांव:जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून काकती येथील दीप ज्योती फाउंडेशन चा उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी या कार्यक्रमांमध्ये प्रथमतः हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, राजमाता जिजाऊ यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले व देशातील पहिली शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचे पूजन नंतर राणी चन्नम्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी या कार्यक्रमांमध्ये मराठी शाळेचे मुख्याध्यापक किरण करंबाळकर अनिल गव्वी आशिष कोचेरी विनायक केसरकर निकिता सुतार यांचा सत्कार करण्यात आला.
या महिला दिनाच्या कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून के पी सी सी सदस्य मलगौडा पाटील, मधुरा शिरोडकर,सुजाता पै ,माजी सैनिक लक्ष्मण मौत ,कृष्णा मुचंडीकर उपस्थित होते.
यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षपद सिद्धाप्पा गाडेकर यांनी भूषविले तसेच या कार्यक्रमाला पी एल डी बँक सदस्य गीता पिंगट ,जिल्हा पंचायत माजी अध्यक्ष सुनील सुणगार ,परशराम धोंजी ,बीएस पिंगट, दीप ज्योती फाउंडेशन संस्थापिका अध्यक्षा ज्योती गवी या उपस्थित होत्या.
यावेळी मान्यवरांनी महिला दिनानिमित्त आपले विचार मांडले.प्रत्येक महिलेने घरामध्ये न बसता आपल्यातील कला गुण बाहेर आणावेत आणि समाजात एक वेगळे कार्य करून दाखवावे असे मत प्रमुख पाहुण्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा टूमरी यांनी केले. यावेळी या कार्यक्रमाला महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.